आलेपाक हा पिढ्या न पिढ्या आलेला पदार्थ आहे. आल्याची चव झणझणीत असते आणि त्यात गूळ घातल्यास त्याच्या तिखटपणाला मारक ठरतो. गूळात लोहची मात्रा चांगल्या प्रमाणात असते व ती शरीराला पोषक ठरते. म्हणून पूर्वी लहान मुलाला गूळ चपाती रोल करून द्यायचे.
आलं पित्तनाशक, अपचन, पोटाचे विकार, सर्दी -कफ साठी अत्यंत गुणकारी.
आल्याची लागवड देशातल्या वेगवेगळ्या भागात केली.
कोकण, सातारा, कोल्हापूर, बेंगळुरू येथील आलं जास्त प्रसिद्ध आहे. बंगलोर आलं बाराही महिने उपलब्ध असते.थोड जाड असते पण त्यात तिखटपणा कमी असतो.
कोकण -सातारा -कोल्हापूर या आल्यात त्या त्या मातीचे गुणधर्म आढळून येतात. नाकाला झिंजझिंण्या
आणणारा वास, आणि तिखटपणा येतो.
आल्याची साधारण लागवड जूनमध्ये होते. त्यांचे वाफे तयार केले जातात. खत, शेणखत यांच्या समवेत आल्याच्या बियाण्याची लागवड केली जाते. साधारण जानेवारी पर्यंत हे आलं तयार होते. ते खणून अलगद काढले जाते. आल्याला फंगस लगेच पकडत म्हणून ते चांगल्या स्थितीत राहावे म्हणून जमिनीत खोलवर खड्डा करून त्यात आलं मातीत मिक्स करून त्यावर गवत टाकून ठेवले जाते. त्यामुळे पाहिजे तेव्हा वापरायला काढून घेता येते. हे आलं वर्षभर चांगल्या अवस्थेत राहते. व बियाणे ही पुढच्या लागवडीसाठी तयार होते.
कोकण- सातारा आलं साधारण लहान आकाराचे असते पण चवीला उत्तम असते. चहा बनवण्यासाठी सातारा आलं उत्तम असते. त्याचा एक वेगळाच सुगंध असतो.
चहाचा व्यवसाय करणारे स्पेशली सातारा आल्याचा वापर करतात.
आल्यापासून अर्क (essential oil) तयार केले जाते. आल्याचा अर्क हाॅटेल व्यवसायासाठी, औषधं बनवण्यासाठी उपयुक्त ठरते.
आल्याचा वापर स्वयपाक करताना सतत होतो. ताज्या आल्यापासून पावडर बनवली जाते. ही पावडर शेजवान चटणी, साॅस, बनवण्यासाठी उपयुक्त ठरते. आलं पावडर वापरण्यास सोपी आणि कमी प्रमाणात लागणारी सामग्री आहे.